वयात आल्यानंतर खुली छिद्र चेहऱ्यावर दिसू लागतात. ही समस्या केवळ मुलींना होत नसून मुलांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. तेलकट त्वचा असणार्यांमध्ये या खुल्या छिद्रांचा त्रास अधिक जाणवतो. वाढत्या वयानुसार त्यांचं प्रमाणही वाढतं. म्हणूनच सुरूवातीच्या टप्प्यावर ही समस्या जाणवल्यास खाली नमूद करण्यात आलेल्या उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
Hair Fall होतोय मग करा हा उपाय..
दूध आणि ओट्स – दोन चमचे ओट्स आणि चमचाभर गुलाबपाणी, मध यांचे एकत्र मिश्रण बनवा. ही पेस्ट १० मिनिटं चेहर्यावर लावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे ओपन पोअर्ससोबतच चेहर्यावरील डागही कमी होण्यास मदत होते.
केळं – केळं आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे, शिवाय त्याचा फायदा सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो. त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवण्यासाठी, चेहर्यावर पुन्हा तेज येण्यासाठी केळं फायदेशीर ठरते. आठवड्यातून दोनवेळा केळं स्मॅश करून चेहर्यावर लावल्याने ओपन पोआर्सचा त्रास कमी होतो.
जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे….
काकडी आणि लिंबू –
ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठी काकडीमध्ये लिंबू पिळा. या मिश्रणाचा रस चेहर्यावर लावा. यामुळे चेहर्यावरील ओपन पोअर्स कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे https://t.co/jvYUuG8FaS
— KrushiNama (@krushinama) January 12, 2020