Skin Care With Besan | बेसनाच्या पिठात ‘या’ गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे

Skin Care With Besan | टीम कृषीनामा: बेसन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. बेसनामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात, जे त्वचेची संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. बेसन पिठाच्या मदतीने त्वचेवरील डाग, मुरूम इत्यादी समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर बेसनाचा वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. बहुतेक लोक बेसन पिठाचा वापर पाण्यासोबत करतात. पाण्यासोबतच तुम्ही बेसन पिठाचा वापर इतर अनेक गोष्टींसोबत करू शकतात. या गोष्टींसोबत बेसनाचा वापर केल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसनाचा पुढील पद्धतीने वापर करा.

बेसन आणि दही (Skin Care With Besan and Curd)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन पिठात दही मिसळू शकतात. दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये तीन चमचे दही मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित बेसन आणि दह्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.

बेसन आणि ग्रीन टी (Skin Care With Besan and Green tea)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन आणि ग्रीन टीचा वापर करू शकतात. या दोघांच्या मिश्रणाने खराब झालेली त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला ग्रीन टीमध्ये दोन चमचा बेसन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

बेसन आणि संत्र्याचा रस (Skin Care With Besan and Orange juice)

संत्र्याच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड उपलब्ध असते, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी बेसन आणि संत्र्याच्या रसाचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये गरजेनुसार संत्र्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावे लागेल. त्वचेची काळजी घेण्यासाठी हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकतात.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन पिठाचा वरील गोष्टींसोबत वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

लिंबू आणि दूध (Lemon and milk For Skin Care)

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि दुधाचा वापर करू शकतात. कच्चा दुधामध्ये विटामिन आणि कॅल्शियम आढळून येते, जे त्वचेला पोषण प्रदान करते. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये चार ते पाच चमचे कच्चे दूध घेऊन त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे लागेल. साधारण पाच मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

लिंबू आणि मध (Lemon and honey For Skin Care)

मध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मधामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एका भांड्यात दोन चमचे मधामध्ये पाच ते सात थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. पाच मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Belpatra Leaves | बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Mayonnaise Side Effects | मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे

Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर

Milk and Turmeric | चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी दूध आणि हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर

Breast Pain | महिलांनो लक्ष द्या! ब्रेस्ट पेन होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय