Dry Skin | हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

Dry Skin | टीम कृषीनामा: आपण नेहमी चेहऱ्याची काळजी घेतो. चेहऱ्याची काळजी घेत असताना आपण हातांच्या त्वचेची काळजी घ्यायला विसरून जातो. त्यामुळे हाताची त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव होते. कोरड्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे हाताच्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकतात. हातांवरील कोरडेपणाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकतात.

मोहरीचे तेल (Mustard oil-For Dry Skin)

मोहरीच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हातांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हाताला मोहरीच्या तेलाने मालिश करू शकतात. त्याचबरोबर अंघोळ करण्यापूर्वी तुम्ही मोहरीच्या तेलाने हाताची मालिश करू शकतात. मोहरीच्या तेलाने हाताच्या त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊ शकते.

मध (Honey-For Dry Skin)

हाताच्या कोरड्या त्वचेपासून सुटका मिळायची असेल तर मध तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मधामध्ये नैसर्गिक मैश्चरायझर आढळून येते. त्याचबरोबर मधामध्ये माफक प्रमाणात विटामिन बी आणि सी आढळून येते. हे दोन्ही जीवनसत्व त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हातावरील कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हातावर मध लावून मसाज करू शकतात. साधारण तीस मिनिटं तुम्हाला हातावर मध लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा हात स्वच्छ धुवावा लागेल.

दही (Curd-For Dry Skin)

कोरड्या त्वचेच्या समस्येवर दही एक रामबाण उपाय ठरू शकतो. दह्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे त्याच्या मदतीने कोरडी त्वचा दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला दह्यामध्ये मध आणि साखर मिसळून घ्यावी लागेल. या मिश्रणाने तुम्हाला पाच मिनिटे हातावर मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे हात स्वच्छ पाण्याने धुवावे लागतील. हे मिश्रण धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातावर तुमची नियमित क्रीम लावावी लागेल.

हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतींचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही पुढील पद्धती फॉलो करू शकतात.

ऑलिव्ह ऑईल (Olive oil For Dry Skin Care)

त्वचेला चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने चेहऱ्यावरील कोरडेपणाची समस्या देखील कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला आंघोळीच्या अर्धा तास आधी कोमट ऑलिव्ह ऑइल चेहऱ्यावर लावून मसाज करावी लागेल. ऑलिव्ह ऑइल अंघोळीच्या आधी चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी होऊ शकते.

बदाम तेल (Almond oil For Dry Skin Care)

बदाम तेलामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेचा रंग सुधारण्यासोबतच त्वचेवरील कोरडेपणाची समस्या देखील दूर करतात. यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेलाने मालिश करावी लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. नियमित त्वचेला बदाम तेल लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Skin Care With Besan | बेसनाच्या पिठात ‘या’ गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे

Belpatra Leaves | बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Mayonnaise Side Effects | मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे

Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर

Milk and Turmeric | चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी दूध आणि हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर