Milk and Turmeric | टीम कृषीनामा: आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा (Glowing Skin) हवी असते. पण धूळ-माती, प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि अनियमित खाण्याच्या पद्धतीमुळे चेहऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि लोशनचा वापर करतात. परंतु ही उत्पादन चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक आणण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरातील हळद आणि दुधाचा वापर करू शकतात. हळद आणि दुधाच्या वापराने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होतात. नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी हळद आणि दुधाचा पुढील पद्धतीने वापर करा.
दूध, हळद आणि चंदन पावडर (Milk, Turmeric & Sandalwood powder For Skin Care)
दूध, हळद आणि चंदन पावडरच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होतात. यासाठी तुम्हाला तीन चमचा दुधामध्ये दोन चिमूट हळद आणि दीड चमचा चंदन पावडर मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. दहा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते.
दूध, हळद आणि मध (Milk, Turmeric & Honey For Skin Care)
दूध, हळद आणि मध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येऊ शकते. या तिन्ही गोष्टी चेहऱ्यावर लावण्यासाठी तुम्हाला तीन चमचे दुधामध्ये दोन चिमूट हळद आणि दीड चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला पाच मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पाच मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशनची समस्या दूर होऊ शकते.
दूध, हळद आणि बेसन (Milk, Turmeric & Besan For Skin Care)
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी दूध, हळद आणि बेसन फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला तीन चमचे दुधामध्ये दोन चमचे हळद आणि दीड चमचा बेसन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते पाच मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पाच मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते.
गुलाब आणि मध (Rose and honey-Beauty Tips)
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाबाची पेस्ट आणि मधाचा फेस पॅक वापरू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाची पेस्ट आणि मध व्यवस्थित मिसळून घ्यावा लागेल. या फेस पॅकमध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गुलाब जल देखील मिळू शकतात. तुम्हाला हा फेस पॅक चेहऱ्यावर वीस मिनिटे लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. हा फेस पॅक त्वचेला हायड्रेट ठेवू शकतो.
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील गोष्टी करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावर गुलाबासारखी चमक आणण्यासाठी तुम्ही गुलाबाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.
गुलाब आणि दही (Rose and curd-Beauty Tips)
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पेस्टमध्ये दही मिसळू शकतात. दही त्वचेवर ब्लिच म्हणून काम करतो. त्यामुळे दह्याच्या मदतीने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही दही आणि गुलाबाच्या पेस्टचा फेस पॅक वीस मिनिटे चेहऱ्यावर लावू शकतात. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या