चवळी लागवड पद्धत

चवळी हे वाटण्यासारखेच वेलवर्गीय पीक असून ते वालुकामय हलक्या जमिनीत देखील घेता येते. हे पीक बाराही महिने म्हणजे तिनही ऋतूत घेतात. सप्तामृत, कल्पतरू यांचा वापर केल्यास वाटाण्यापेक्षा चवळीची चव चांगली होते. तसेच भरघोस पीक घेता येते. चवळी हे जमिनीवर पसरणारे (वेलवर्गीय) पीक असून दुष्काळी भागात पाण्याचे संवर्धन करणे. कमी पाणी असल्यास त्यातदेखील पाण्याची बचत करणे हा याचा महत्वाचा उपयोग आहे. चवळी हे वाटाण्यापेक्षा गोड, चवदार, पौष्टिक अधिक प्रथिने असणारे कडधान्य आहे. बाळंतपणामध्ये बाळंतीणीला चवळीच्या दाण्यांनी भाजी जास्त खावयास देतात. शेंगवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये चवळीचा  समावेश होतो.

जमीन –

हलक्या जमिनीत पाणी पुरवठा कमी पडल्यास फुले वळण्याचे प्रमाण वाढते. मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड करावी.

हवामान –

चवळीच्या वाढीसाठी उष्ण हवामान चांगले मानवते. खरीप तसेच रब्बी हंगामातील लागवडीसाठी हे पीक घेतात. शेंगा तोडणीचे वेळी थंड हवामान पिकास फारच मानवते.

बियाणे :-

एकरी ६ किलो बियाणे लागते.

बीजप्रक्रिया –

२५ ते ३० मिली जर्मिनेटर चे १ लि. पाण्यात द्रावण तयार करून त्यात १ किलो बी १ ते २ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून टोकणे.

लागवड –

जमिनीची पुर्व मशागत करून जमिनीत एकरी ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. उंच वाढणाऱ्या चवळीच्या जाती साधारावर चढवाव्या. बुटक्या जातीच्या मानाने त्यांच्या पानांचा व फांद्यांचा पसाराही जास्त असल्याने त्यांची लागवड खरीप हंगामात १ ते १.५ मी. अंतर दोन ओळींमध्ये ठेवून सरीच्या एका बाजूला ४५ ते ६० सेंमी अंतरावर एक बी टोकून करावी.

जाती –

पुसा बरसाती, पुसा दो फसली व पुसा कोमल या चवळीच्या जाती आहेत.

पुसा बरसाती –

कोवळ्या शेंगाच्या उत्पादनास उत्तम जात आहे. शेंगा मध्यम लांब व फिक्कट हिरव्या असून एकरी २० ते २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

पुसा दो फसली

बुटकी व लवकर येणारी जात असून शेंगा १२ ते १५ सेंमी लांबीच्या फिक्कट हिरव्या रंगाच्या असतात. एकरी २४ ते २८ क्विंटल उत्पादन मिळते.

पुसा कोमल –

शेंगाची लांबी २० ते २२ सेंमी, रंग हिरवा, दाणा पांढरा, गोल, लांबट आणी जाड असल्याने उसळीसाठी चांगला असतो.

भाग्यलक्ष्मी –

केरळ कृषी विद्यापीठाने नायजेरियातून आयात केलेल्या चवळीतून निवड पद्धती ने ही जात शोधली आहे. या जातीचे प्रति एकरी २.६० टन ताज्या चवळीचे (शेंगाचे) उत्पादन मिळते. हेच चवळीचे झाड झुडपी प्रकारचे असून पेरणीपासून ४१ दिवसांनी पांढरी फुले धरण्यास सुरुवात होते आणि सुमारे ४८ दिवसांनी चवळीच्या शेंगाची पहिली तोडणी करता येते. शेंगा सुमारे ३० सेंमी लांब, फिक्कट हिरव्या रंगाच्या आसतात. शेंगात टपोरे दाणे असतात. एक शेंगा ७ ते १३ ग्रॅम भरते. एका झुपाक्यात २ ते ४ शेंगा असतात. एका झाडापासून ७० ते ९० शेंगा मिळतात. या जातीची वर्षभर लागवड करता येते. पेरणीसाठी प्रति एकरी सुमारे १० किलो बी लागते. झाडामध्ये २० – ३० सेंमी अंतर ठेवावे. चवळीच्या शेंगा आकर्षक असल्याने बाजारभाव चांगला मिळतो. ही जात अॅन्थ्रेकनोज रोगाला प्रतिकारक आहे. या पिकाला सेंद्रिय खते भरपूर द्यावी. धान (भात) पिकाभोवती या चवळीचे पीक घ्यावे.

ऋतुराज पुसा फाल्गुनी –

या जातीचे बी एकरी ६ ते ८ किलो लागते. सपाट वाफ्यात एक ते दीड फुट अंतरावर जर्मिनेटर ची बीजप्रक्रिया करून टोकावे.

खते –

बागायती क्षेत्रामध्ये चवळीचे भरघोस उत्पादनासाठी लागवडीपुर्वी पुर्ण कुजलेले शेणखत किंवा एकरी ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. नंतर १ महिन्याने पुन्हा ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत चवळीच्या झाडापासून २” ते ३” अंतरावर गाडून द्यावे. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुसीत होऊन पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

पाणी नियोजन –

खरीप हंगामात गरजेनुसार तर हिवाळी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे १० ते १२ व ५ ते ६ दिवसांनी नियमित पाणी द्यावे.

कीड व रोग –

चवळीवर प्रामुख्याने मावा कीड आणि बुरशी व करपा हे रोग येतात. थंडी, झिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे हे रोग होतात.

फवारणी –

कीड व रोगमुक्त पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच भरघोस, दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची खालीलप्रमाणे फवारणी करावी.

पहिली फवारणी : (उगवणीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २०० मिली. + १५० लि.पाणी.

तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

तोडे चालू झाल्यानंतर दर १५ दिवसांच्या अंतराने वरीलप्रमाणे (फवारणी क्र. ३ प्रमाणे) फवारणी घ्यावी.

काढणी –

उंच, पसरट वाढणार्‍या जातीचे वेळ आधारासाठी मांडवावर चढवावेत. जरुरीप्रमाणे खुरपणी करावी. लागवडीपासून ४० ते ४५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होऊन ४ ते ५ दिवसांच्या अंतराने नियमित काढणी करावी. साधारण एकरी २.५ ते ३ टन कोवळ्या शेंगाचे उत्पादन मिळते.

अशाप्रकारे कमी पाण्यावर, हलक्या जमिनीत उन्हाळी, पावसाळी, हिवाळी अशा तीन ऋतूत हे पीक घेऊन उत्तम प्रकारे पैसा मिळू शकतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेतलेल्या चवळीचे वैशिष्ट्ये : वाटाण्याच्या तुलनेत चवळी हे पीक भरघोस उत्पादन देऊन चांगले पैसे होतात. तसेच मधुमेह असणारे रुग्ण वाटाण्यातील शर्करेमुळे वाटाणा खाऊ शकत नाहीत तर ही चवळी पौष्टिक असून शर्करा कमी असल्याने मधुमेहाच्या रूग्णांना उपयोगी ठरते. वाटाणा तोडणीला आल्यानंतर २ – ३ तोड्यात संपतो आणि बाजारभाव सापडतीलच असे नाही. तसेच वाटाण्याला जमीन मध्यम ते भारी कसदार लागते आणि उत्पादन त्यामानाने कमी निघते.

चवळी ही आठवड्याला तोडता येते. २ – ३ महिने चालते. तसेच चवळीला वर्षभर १५ -२० रू. ते २५ – ३० रू. किलोपर्यंत बाजारभाव मिळतो. चवळी ही हलक्या, भुरकट ते चुनखडीच्या जमिनीतदेखील येते.त्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने कल्पतरू खताची मात्र चवळीच्या झाडाचे दोन्ही बाजूला ४ ते ६ इंच अंतरावर लोखंडी सळईने होल पडून चहाचे चमचाभर खत टाकून होल बुजविणे. खत एरवी फेकुन किंवा बांगडी पद्धतीने दिले जाते. त्यामुळे त्या खताचा मुख्य पिकाला फायदा कमी होऊन अनावश्यक तणांची वाढ होऊन, उत्पादनात घट येते. तसेच खुरपणीचा खर्च वाढतो. त्यासाठी वरील पद्धतीचा वापर करून आपला अनुभव कळविणे. चवळीच्या शेंगा विकून किंवा दाणे करून सुद्धा पैसे मिळतात. तसेच सर्व स्तरातील लोक भाजीसाठी चवळीचा वापर करतात. उन्हाळ्यामध्ये वाळलेली चवळी चौकोनी कुटूंबासाठी १०० ते १२० ग्रॅम सुद्धा पुरते. त्यामुळे मुग, मटकी, मसुराप्रमाणे चवळी ही उपयुक्त आहे.

महत्वाच्या बातम्या-

पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू, मुलाला साहेब करण्याचं स्वप्न अधुरं 

दुधपिशवीवर प्लास्टिक बंदी, तरी रिकामी पिशवी परत केल्यास ५० पैसे ग्राहकांना मिळणार

पीकविमा कंपन्या आणि बँकांनी शेतकऱ्यांचे हित न जोपासल्यास त्यांना धडा शिकवू ; रामदास कदम