राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. एकीकडे सरकार आणि सत्ताधारी मित्रपक्ष दुष्काळ दौरे आखतात. शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतात. परंतु, शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष आहे. हिंगोलीतील एका शेतकऱ्याने घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळुन बियाने खरेदीसाठी किडनी देण्याची घटना घडली असतानाच वाशिम जिल्ह्यातील वसारी येथील अरुण लादे या शेतकऱ्याने पेरणीसाठी पैसे नसल्याने २ एकर शेतात दगडांची पेरणी केली आहे.
गेल्या वर्षभरात शेतकऱ्याला दुष्काळाने ग्रासले आणि आता पेरणीची वेळ आली असता पेरणीसाठी पैसे नसल्याने पेरायचं तरी काय? या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे दगडांची पेरणी करून या शेतकऱ्याने शासनावर आपला रोष व्यक्त केला. या सर्व प्रकरणात महत्वाची आणि दुर्दैवाची बाब ही की, ज्या विदर्भात या शेतकऱ्यावर दगडांची पेरणी करण्याची वेळ आली त्याच विदर्भाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे आहेत. नेहमीच बी-बियाण्यांसाठी सावकारांचे उंबरठे शेतकऱ्यांना झिजवावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यावर ओढवलेल्या या परिस्थितीला सरकार आणि सरकारचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
जलसंवर्धन, सिंचन क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी इस्त्रायलचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल – देवेंद्र फडणवीस
आनंदाची बातमी ! घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १००.५० रूपयांची कपात