नोंदणीकृत खत विकण्यसाठी कुठलीही मनाई नाही

पुणे : गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. खाते ही पिकांसाठी खूप महत्वाची असतात. यात वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकाना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे त्यांना संपूर्ण वाढीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.

परवाने निलंबनाचा कालावधी सोडून नोंदणीकृत खतांची विक्री करण्यास खत कंपन्यांना मज्जाव करू नका, असे स्पष्ट आदेश कृषी आयुक्तालयाने गुणनियंत्रण निरीक्षकांना दिले आहेत. आयुक्तालयातील गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे यांनी बुधवारी (ता. २९) गुणनियंत्रण निरीक्षकांना समज देणारा आदेश काढला. यात एकूण ९ कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांना आता परवाना निलंबन कालावधी वगळून इतर कालावधीतील उत्पादित खते विकता येणार आहेत.

खतांचे उत्पादन, आयात, साठवणूक केल्यामुळे या ९ कंपन्यांचे सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खत उत्पादकांचे निर्मिती प्रमाणपत्र व विक्री प्राधिकारपत्र सात डिसेंबरला निलंबित करण्यात आले होते. यासाठी या कंपन्यांपुरते आता स्वतंत्र पत्र काढून गुणनियंत्रण निरीक्षकांची कानउघाडणी करण्यात आली आहे.

त्या आदेशात असे म्हंटले आहे की,‘‘निलंबनाच्या आदेश दिनांकापासून खताचे उत्पादन व विक्री अपेक्षित नाही. मात्र कंपन्यांनी या आदेशापूर्वी उत्पादक व विक्रेत्यांकडे त्यांच्या विक्री प्राधिकारपत्रात समाविष्ठ केलेल्या नोंदणीकृत खतांची विक्री करता येईल,’’

‘या कंपन्यांनी लेखी निवेदनाने असे निदर्शनास आणले आहे की खत विक्री करण्यात अडथळा निर्माण केला जात असून हे बरोबर नाही. निलंबनपूर्वीच्या कालावधी मधील खते विकण्यात काहीही चुकीचे नाही. खताची गुणवत्ता तपासण्यासाठी निरीक्षक या खतांचा नमुना काढू शकतात,’’ असे श्री. घावटे यांनी नमुद केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं – आ. रवी राणा

हवामान अंदाज : महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तापमान घटणार

हिंगोलीत शेतकऱ्यांनी केली पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

नव कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र यावे – देवेंद्र फडणवीस