Periods Cramps | मासिक पाळीतील असाह्य वेदनांपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Periods Cramps | टीम कृषीनामा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना पोट दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी अनेक महिला औषधांचे सेवन करतात. पण औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपायांचा वापर करू शकतात.

हीटिंग पॅड (Heating pad-For Periods Cramps)

मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी हीटिंग पॅड तुमची मदत करू शकतो. हीटिंग पॅड स्नायूंना आराम देतो आणि वेदना कमी करतो. हीटिंग पॅड वापरताना तो खूप गरम नसावा. कारण हीटिंग पॅड खूप गरम असल्यामुळे त्वचेला जळजळ आणि नुकसान होऊ शकते.

व्यायाम (Exercise-For Periods Cramps)

व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिनचे उत्पादन वाढते. एंडोर्फिन एक नैसर्गिक पेन किलर म्हणून काम करते. मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी तुम्ही काही निवडक योगासने करू शकतात किंवा वॉक करू शकतात. मासिक पाळी दरम्यान हलके व्यायाम केल्याने तुम्हाला वेदनांपासून सुटका मिळू शकते.

कॅमोमाइल चहा (Chamomile tea-For Periods Cramps)

कॅमोमाइल चहा वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या चहामध्ये हळद आणि आले यांसारखे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी तुम्ही या चहाचे सेवन करू शकतात.

मेथी (Fenugreek for Periods Cramps)

मेथी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीतील वेदनांवर मात करण्यासाठी तुम्ही मेथीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला रात्री एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्हाला या पाण्याचे सेवन करावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या मासिक पाळीतील वेदना कमी होऊ शकतात.

हळदीचे दूध (Haldi Milk for Periods Cramps)

मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने वेदना कमी होऊ शकतात. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने पोट दुखणे कमी होऊ शकते. त्याचबरोबर या दुधाचे सेवन केल्याने सूज येण्याची समस्या देखील दूर होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

दूध आणि काजू (Milk & Cashews for Periods Cramps)

मासिक पाळीतील वेदनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दूध आणि काजूचा समावेश करू शकतात. दुधासोबत काजूचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मासिक पाळी दरम्यान तुमचे पोट खूप दुखत असेल, तर तुम्ही दुधासोबत काजूचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Digestive System | पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Hair Fall | ‘या’ गोष्टी थांबवू शकतात केस गळती, जाणून घ्या

Dark Elbow | हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती

Amla and Curd | दही आणि आवळ्याच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होऊ शकतात दूर

Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील ‘हे’ अनोखे फायदे