हिवाळ्यामध्ये चेहऱ्याप्रमाणे आपल्या डोक्याची त्वचाही कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाम हे अधिक असतं. काही वेळा हे प्रमाण अधिक वाढतं आणि मग अंगावर कोंडा पडण्याएवढा होतो. त्यामुळे हिवाळ्यात कोंडा होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक असतं.
Hair Fall होतोय मग करा हा उपाय..
हिवाळ्यात लहक्या कोमट पाण्याचा वापर केस धुवण्यासाठी करावा. केसांना हेअर कंडिशनिंग आवर्जुन करावं. त्यामुळे केसं रफ होत नाहीत.कापूर हे अॅन्टीबॅक्टेरियल म्हणून ओळखले जाते. खोबरेल तेलामध्ये थोडासा कापूर विरघळवून या कोमट तेलानं केसांना मालिश करावी. दुसऱ्या दिवशी अथवा दोन तासांनी केस धुवून टाकावे.केसांची मजबूती वाढवण्यासाठी आणि कोंडा घालवायचा असेल तर 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा. सकाळी ही मेथी वाटून त्याची पेस्ट केसांना लावावीअर्ध्या तासानंतर आपले केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या.
मतदार ओळखपत्र नसल्यास या ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य
डोक्यामध्ये शाम्पू अथवा कंडीशनर राहणार नाही नीट धुतला जाईल याची काळजी घ्या. शिकेकाई पावडर वापरणाऱ्यांनीही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.आंबट दही केसांना लावलं तरीही केसांमधला कोंडा कमी होतो आणि केसांना वॉल्यूम येण्यास मदत होते.केसांच्या मुळांना कडुनिंबाचा रस लावला तरीही डोक्याला कोंड्यानं येणारी खाज कमी होते. ते शक्य नसेल तर नुसता कडुनिंबाचा पाला उकळत्या पाण्यात टाका आणि त्या पाण्याने डोकं स्वच्छ धुवा.
मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी https://t.co/f49N2OvQ9R
— KrushiNama (@krushinama) December 25, 2019
सर्दीसाठी करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय ! https://t.co/8wXqvYAZ02
— KrushiNama (@krushinama) December 25, 2019