द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक

मागील वर्षाच्या द्राक्ष हंगामात ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या द्राक्ष निर्यातदार कंपनीने निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड तालुक्यांतील शेतकऱ्‍यांचे २ कोटी ४२ लाख ४६ हजार रुपये किमतीच्या द्राक्ष मालाची खरेदी केली. द्राक्ष उत्पादकांना या व्यवहारापोटी धनादेश दिले. मात्र, ते वटले नाही. यावर अनकेदा कधी पैसे देण्याचे वायदे केले. पैशांची मागणी करूनही ते मिळाले नाहीत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली, असून त्यानुसार तीन जणांवर पिंपळगाव बसवंत पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१८-१९ वर्षाच्या चालू द्राक्ष हंगामात ७० द्राक्ष उत्पादकांनी माल आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या कंपनीला दिला होता. मात्र, एक वर्ष होत आले तरी पैसे मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक रमेश खैरे यांच्यासह अन्य द्राक्ष उत्पादकांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पावसामुळे द्राक्ष बागांचे ९ हजार कोटींवर नुकसान

यावेळी द्राक्षउत्पादक रमेश खैरे, अनिल कोठुळे, विनोद पाटील, नंदू मते, आनंद गायकवाड, अनिल जाधव, रोहित जाधव, बाळासाहेब गायकवाड, राजाभाऊ परदेशी, रमेश कुयटे उपस्थित होते.