पीकविम्यासाठी आता दोन दिवसाची मुदत

यावर्षी विपरित हवामान असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मान्सून लांबल्याने पेरण्या विलंबाने झाल्या आहेत. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने पिकांची भयावह परिस्थिती आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई दिली जाते.  सन २०१९-२० खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर्षी मान्सून लांबल्याने आणि त्यानंतरही पावसात सातत्य नसल्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी सन २०१९-२० खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, पात्र शेतकऱ्यांना २४ जुलैपूर्वी पिकाचा विमा उतरविणे बंधनकारक आहे.

२४ जुलैपर्यंत पीक विम्याचे प्रस्ताव स्विकारले जाणार आहेत. वाशीम जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी वाशिम जिल्ह्याकरिता भारतीय विमा कंपनीची नेमणूक झाली आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –

शिवसेनेचा उद्या विमा कंपन्याच्या कार्यालावर धडक मोर्चा

औरंगाबाद व लातूर विभागात पीकविमा योजनेतील घोटाळ्याची कबुली दिली : मुख्यमंत्री