अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या

कर्जबाजारी आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. भास्कर राजणकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोक नगर येथील ही घटना आहे.यावर्षी कशीबशी आर्थिक तडजोड करून पाच एकर शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतातलं पीक करपलं.

हा धक्का सहन न झाल्यानं राजणकर यांनी विदर्भ नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. राजणकर यांच्यावर सोसायटीचे आणि अन्य उधारी मिळून एक लाख रुपये कर्ज आहे. भास्कर यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान,  पीक विम्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला होता. 17 जुलै रोजी बीकेसीमधील विमा कंपनीच्या मुख्यालयावर शिवसेनेनं महामोर्चा काढला होता.

महत्वाच्या बातम्या –

फडणवीस आणि चंद्रकांत दादांची जोडी करणार भाजपचे नेतृत्व

‘एकीकडे दादांचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ, तर दुसरीकडे गडकरी म्हणतात टोल भरा’

राजीनामे मागे घ्या ; अन्यथा पक्षांतरबंदीअंतर्गत कारवाई करू