Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

Eye Care | टीम कृषीनामा: आजकाल लोक आपला बहुतांश वेळ कम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईल यासारख्या उपकरणांवर घालवत असतात. तर काही लोक आपला वेळ घालवण्यासाठी वेब सिरीज आणि चित्रपट बघत असतात. बराच वेळ स्क्रीनसमोर घालवल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसमोर वेळ घालवल्याने डोळ्यांना दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. यामुळे काचबिंदू, मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, रातांधळेपणा इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात. यासाठी तुम्ही काही ज्यूसचे सेवन करू शकतात. पुढील ज्यूसचे सेवन केल्याने डोळे निरोगी राहू शकतात.

संत्र्याचा रस (Orange juice for Eye Care)

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याच्या रसाचा समावेश करू शकतात. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी संत्र्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

पालकाचा ज्यूस (Spinach juice for Eye Care)

हिरव्या पालेभाज्या अँटीऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात पालकाच्या ज्युसचा समावेश करू शकतात. या रसाचे नियमित सेवन केल्याने दृष्टी चांगली राहू शकते. यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आढळून येते, जे डोळ्यांची काळजी घेण्यास मदत करते.

टोमॅटोचा ज्यूस (Tomato juice for Eye Care)

टोमॅटोच्या रसामध्ये डोळ्यांसाठी आवश्यक असणारे पोषक तत्त्वे आढळून येतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, पोटॅशियम, यासारखे पोषक घटक उपलब्ध आहेत. टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे घटक आढळून येते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे टोमॅटोच्या रसाचे सेवन करणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

नारळ पाणी (Coconut water for Eye Care)

नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये विटामिन सी आणि ओमेगा ॲसिड यांचा समावेश आहे. हे घटक डोळ्यातील प्रोटेक्टिव्ह टिशू सुधारण्यास मदत करतात. नियमित नारळ पाण्याचे सेवन केल्याने काचबिंदूचा धोका कमी होऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | राज्य शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे

Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

CBSE Admit Card | इयत्ता दहावी आणि बारावी CBSE अॅडमिट कार्ड जारी