थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता का जाणवते ?

हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो त्वचेला आणि पोटाला. हवेतील थंडाव्यामुळे त्वचा रुक्ष होते. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे अति भूक आणि झोपेमुळे आपला आहार आपण हवामानानुसार न बदलल्यानं त्रास होतो. बदलत्या वातावरणानुसार आपल्या रोजच्या सवयी आणि काही खाण्यापिण्याची गोष्टी बदलणं गरजेचं असतं.हिवाळ्यात सर्वात जास्त ड जीवनसत्व आणि मिनिरल्सची कमतरता जाणवते असं एका अहवालातून समोर आलं आहे. ड जीवनसत्व आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. सूर्यकिरण ड जीवनसत्वाचा उत्तम स्त्रोत आहे.

परदेशातून कांदा आयात करणे हे सरकारचे चुकीचे धोरण-जितेंद्र आव्हाड

मात्र आपलं वेळापत्रक घड्याळ्याच्या काटावर चालणारं असल्यानं आणि ऑफिसमध्ये एसीत बसल्यानं ड जीवनसत्व मिळवण्यासाठी आपण उन्हात उभं राहू शकत नाही.आपल्या शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता आहे हे कसं ओळखावं.

बऱ्याचवेळा कामाचा ताण नसतानाही अथवा फार काम न करताही खूप थकवा आल्यासारखं वाटतं. डोकं जड होतं आणि हात पाय दुखतात. अशावेळी तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आणि ड जीवनसत्व कमी झाल्याचं लक्षण आहे हे समजून घ्या. बऱ्याचवेळा काही कारण नसताना हाता पायांना सूज येते. काहीवेळा हा शरीरातील बदलत्या हार्मोन्समुळेही होऊ शकतं. त्यामुळे शरीर सतत सूजत असेल अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.ड जीवनसत्व मिळवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

चक्रधर बोरकुटे यांनी सेन्सरची केली निर्मिती

१. ड जीवनसत्वासाठी रोज दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा आहारात समावेश करावा.

२. टुना माशांचं सेवन आहारात करावं. शार्क लिवर ऑइलमधूनही ड जीवनसत्व मिळतं.

३. पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात डी जीवनसत्व असतं. त्यामुळे भाज्या अथवा नाश्त्यामध्येही पनीरचा वापर केला तर त्याचा फायदा अधिक होऊ शकतो.

४. रोज कोवळ्या उन्हामध्ये रोज 10 ते 15 मिनिटं व्यायाम केला तरीही तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकतं. हा नैसर्गिक आणि सर्वोत्तम पर्याय आहे.