हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा !

जर तुम्हाला प्रदीर्घ काळासाठी हृदय ताजंतवानं ठेवायचं असेल तर या सहा गोष्टींचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करायलाच हवा.

कलिंगड- कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. कलिंगडची खासियत म्हणजे याच कॅलरीही कमी असतात. तसेच अण्टिऑक्सीडेंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. विटामीन सी, ए, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियमचे पूर्ण सत्त्व कलिंगडमधून मिळतात.

फणसाचे प्रकार व त्यापासून बनणारे रुचकर पदार्थ

टॉमेटो- टॉमेटोही हृदयासाठी असतो उपयुक्त. टॉमेटोमधून विटामीन सी मिळते. टॉमेटोमध्ये लाइकोपीनचे प्रमाण भरपूर असते. विटामीन सी आणि अण्टिऑक्सीडेंटचे टॉमेटोमध्ये असलेल्या प्रमाणाचा हृदयाला फायदाच होतो.

बेरीज- इतर फळांप्रमाणे बेरीजमध्येही अण्टिऑक्सीडेंचटे प्रमाण जास्त असते. चांगले कोलेस्ट्रॉल वाढायला मदत करते. अंगातील चरबीचे रुपांतर उत्साहात करते. तसेच हाडांसाठी बेरीज हे फळ उत्तम आहे.

बीन्स- हृदयासाठी बीन्सही तितकेच फायदेशीर आहेत. बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. बेरीजप्रमाणे चांगले कोलेस्ट्रॉल वाढायला मदत करते. बीन्समध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ओमेगा ३ फॅट्सचे सत्त्व अधिक प्रमाणात असतात. याचा हृदयाला फार फायदा होतो.

हिवाळ्यात आजारांपासून दूर ठेवतील ‘ही’ 6 फळे

एवोकाडो- एवोकाडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. पोटॅशियमचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते. एवोकाडोमुळे रक्तदाम नियंत्रित राहण्यास मदत होते.

अक्रोड- अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅट्स आणि अण्टिऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक असते. दिवसाला एक अक्रोड खाल्ल्यास हृदयाचे विकार फारसे होत नाहीत.