राज्यातील ‘या’ ३ जिल्ह्यांना अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका; भाजीपाल्याचे मोठे नुकसान

मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटचा  पाऊस झाला आहे. तर राज्यातील औरंगाबाद , वाशिम , नागपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी (Premature) आणि गारपिटीचा पाऊस झाला.

अवकाळी (Premature) आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या वाफ्यामध्ये पाणी साचले असून कोथींबीर, मेथी, पालक हे पाण्यात आहे. तर तुरीच्या शेंगा अक्षरश: चिखलाने माखलेल्या आहेत. त्यामुळे आता काढणीही शक्य नसल्याने हे नुकसान भरुन काढावे कसे असा सवाल आहे. जिल्ह्यातील कामरगाव, धनज बु गावासह सबंध जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर अनेक ठिकाणी गारपिटही झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उगवण झालेल्या पिकांना गारपिटीचा मारा लागल्याने आता पिकांची वाढ होते की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यतील अनेक गावांना अवकाळी पावसाने (Untimely rain) आणि गारपिटीने तडाखा बसला आहे. वैजापूर तालुक्यतील देवगाव ,शनि चेंडूफळ, बाजाठाण , गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा ,आणि  गंगापुर मध्ये गारपीट आणि पाऊस झाला. अवकाळीपाऊस

औरंगाबाद जिल्ह्यातील  कन्नड आणि पैठण तालुक्यतील अनेक गावांना ही तुफान पाऊस झाला.  तर राज्यातील विदर्भ भागातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्याला  सळधार पावसाने आणि गारपिटीने तडाखा बसला आहे.

राज्यातील नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली.  नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  तूर आणि हरभरा पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी आहे.

महत्वाच्या बातम्या –