जिल्ह्याच्या गरजेनुसार आरोग्य सुविधांवर भर द्या – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा बळकट करावी लागणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसाठी लागणारी सामुग्री खरेदी करताना गरजेनुसार आरोग्य सुविधा उपकरणे खरेदीवर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी दिले.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समिती निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममुर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, उपवसंरक्षक अक्षय गजभिये, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते,आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नवीन पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात नवीन संकल्पना आणि योजनांना प्राधान्याने निधी देण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी पांदण रस्यांर्चे महत्व आहे. त्यामुळे पांदण रस्यांन्साठी येत्या वर्षात निधी देण्यात येईल. पांदण रस्यांंकसोबत ग्रामीण रस्यांल्साठी निधी उपलब्ध करून देण्यात येतील. लघु सिंचन योजनेतील प्रकल्पांच्या भूसंपादनांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे यासाठी निधी देण्यात येईल. भूसंपादनासाठी उपलब्ध करून दिलेला निधी तात्काळ वितरीत करण्यात यावा. कोविडच्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्यात यावा. कोविडच्या बदल्या स्थितीनुसार ओमायक्रॉनची चाचणी जिल्ह्यात होणे गरजेचे आहे. येत्या काळात ओमायक्रॉनचा प्रसार कशा प्रकारे होते, हे पाहून आरोग्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जिल्हास्तरावर मोठ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी लागणारी उपकरणे जिल्हा नियोजनच्या निधीमधून करण्यात यावे. विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठीही प्रयत्न करावा. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा लाभ अनुसूचित जमातींच्या नागरिकांनी घ्यावा, यासाठी प्रयत्न करावे.

वाचन संस्कृती रूजविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा नियोजनमधून गाव तेथे वाचनालय ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक आणि युवकांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके ठेवण्यात येतील. याचा उपयोग गावातील नागरिक करू शकतील. येत्या वर्षात जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीसाठी नियम आखण्यात आले आहे. आय पास प्रणाली उपयोगात आणण्यासोबत ज्या विभागांना निधी उपलब्ध करण्यात आला आहे, त्यांच्यावर शासन निर्णय उपलब्ध करून घेणे, आय पास प्रणालीवर संबंधित सर्व माहिती अपलोड करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे. जेणेकरून विभागस्तरावरील बेठकीत जिल्ह्यासाठी जादा निधी मान्य करून घेता येणे शक्य होईल, असेही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी सांगितले.

आरोग्य सेवेचा आढावा

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी ऑक्सीजनची स्थिती, खाटांची संख्या, खाटांचे नियोजन, औषधी साठा आदी बाबत माहिती दिली.  लसीकरण आणि निर्बंध पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, तसेच निर्बंध पाळत नसलेल्या नागरिक आणि कार्यक्रमावर कार्यवाही करावी. या केलेल्या कार्यवाहीला प्रसिद्धी द्यावी. नागरिकांना कार्यवाहीचा धाक बसावा यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी थडक कार्यवाही करावी. कार्यवाही अभावी नागरिकांकडून निर्बंध पालन होत नसल्यास रुग्णांची संख्या वाढून आरोग्य सुविधावर त्याला त्याचा ताण येईल. ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी स्थानिकस्तरावर यंत्रणा निर्माण करावी. त्यामुळे उपचार तातडीने होण्यास मदत मिळेल. जिल्ह्यात लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाची गती वाढवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. १५ ते १८ वयोगटातील लसीकरण तसेच बुस्टर डोजचे नियोजन करण्यात यावे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशही श्री. शिंगणे यांनी यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या –