डासांमुळे हैराण आहात ? तर मग आवारात लावा ही झाडं

पावसाळा झाला कि मच्छरांचा त्रास वाढतो आणि हे मच्छर रात्रीचा दिवस करतात. या करिता आपण अनेक उपाय करतो उदा. coil किंवा काही प्रायवेट कंपनीने बाजारात आणलेली उत्पादने, आता तर अगरबत्ती सुध्दा आलेली आहे ज्यामुळे मच्छर मरतात परंतु त्या वायूपासून हृद्ययाचे अनेक रोग होतात हे वैज्ञानिकांनी सांगितलेले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या आवारात काही झाडं लावल्यानेही तुम्हाला मच्छरांपासून सुटका मिळेल. अशी झाडं आहेत, ज्यांच्यामुळे डास दूर पळतात. या झाडांच्या सुगंधांमुळे डास त्याठिकाणी फिरतही नाहीत.

 चला तर मग जाणून घेऊयात घराच्या आवारात कुठली झाडे लावावीत……..

राज्यभर वीज बिलांची होळी केली जाणार – राजू शेट्टी

तुळस –

आपल्या सर्वांच्या घरात तुळस असतेच. तुळस वातावरण तर शुद्ध ठेवतेच याशिवाय मच्छरांपासूनही मुक्ती देते. तुळशीचा वापर करून असे सुगंधी तेल तयार केले जातात ज्यामुळे डास आणि माशांना दूर ठेवता येतं. त्यामुळे घराच्या बाहेर किंवा खिडकीत तुळस ठेवल्यानं त्याच्या वासाने मच्छर दूर पळतील. विशेष म्हणजे मच्छर चावल्यानंतर त्वचा लालसर होते, त्यावेळी त्या ठिकाणी तुळशीच्या पानांचा रस लावल्यानेही फायदा होतो.

सिट्रोनेला – 

मॉस्किटो रेप्लिएंट क्रिममध्ये या झाडाच्या पानांचा वापर केला जातो. मच्छरांपासून बचाव करण्यासाठी हे झाड खूप परिणामकारक आहे. याच्या वासामुळे मच्छर दूर पळतात. या झाडाच्या पानांचा रस काढून त्वचेवर लावल्यास मच्छर आपल्या जवळ अजिबात येणार नाहीत.

सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी बियाणे उत्पादकांवर गुन्हे दाखल – दादा भुसे

पुदीना – 

पुदिन्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याच्या वासामुळेही मच्छर दूर राहतात आपल्याजवळ येत नाहीत.

गोंड्याच्या फुलाचं झाड – 

या झाडात पायरेथ्रम नावाचं असा घटक असतो, ज्यामुळे मच्छर त्याच्या आसपासही येत नाही. या झाडाचा वासानेच मच्छर दूर राहतात. तुमची बाग असल्यास त्या बाहेत हे झाड लावा.

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

झेंडू – 

झेंडूच्या झाडापासून येणाऱ्या सुगंधामुळे मच्छर आणि अनेक कीटक दूर राहतात. झेंडूचे अनेक प्रकार आहेत आणि हे सर्व मच्छर दूर ठेवण्याकरिता बचाव करतात. झेंडूच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. हे झाड उन्हात ठेवावे.

मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय ? हे नक्की वाचा

लेमन बाम – 

हे झाड घराच्या सजावटीत वापरलं जातं. या झाडाच्या फुलांचा गंध खूप तीव्र असतो, ज्यामुळे मच्छर पळतात. हे झाड उन्हात ठेवू नका.

एग्रेटम प्लांट – 

हेदेखील एक चांगलं मॉस्किटो रेप्लिएंट आहे. या झाडातून येणारा वासही इतका तीव्र असतो की मच्छर घरात येणारच नाहीत. मॉस्किटो रेप्लिएंट आणि परफ्युम तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही आता मच्छरांपासून हैराण झाला असाल तर ही झाडं नक्की लावून पाहा.

दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

कडुलिंब – 

कडुलिंबाचा पाला आपण अनेक काळापासून घरात जाळत आलेले आहो त्यामुळे मच्छर येत नाही हे सर्वाना माहिती आहे. कडुलिंबापासून त्वचेचे अनेक रोग तसेच सौंदर्यवर्धक म्हणून देखील उपयोग होतो. कडुलिंब हि बहुगुणी वनस्पती आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

महागडे औषध नाही, तर पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर का फायदेशीर असतो, घ्या जाणून……

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी; आता शेतमालाच्या विक्रीसाठी वापरा अॅग्रीबाजार अॅप..!