हिवाळा सुरू झाल्यानंतर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी चहा कॉफी (Coffee) अनेकदा प्यायली जाते. तसंच कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. काम करण्यासाठी उत्साह असतो. पण चहा किंवा कॉफी (Coffee) कोणत्यावेळी प्यायला हवा, हे माहीत असणं महत्वाचं असतं. कारण कोणत्याही वेळेत कॉफी (Coffee) घेतल्यास जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
अनेक जणांची सकाळ ही कॉफी (Coffee) प्यायल्यानंतर सुरू होते. जर चहा किंवा कॉफी घेतला नाही तर अनेकांना डोकं जड झाल्यासारख वाटतं. पण कॅफिनचं सर्वाधिक सेवन केल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतं तसंच कॉफी योग्यवेळी घेतली नाही तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
जर तुम्ही सकाळी उठल्याउठल्या कॉफी (Coffee) पित असाल तर ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. असे केल्यास शरीरातील कॉर्टीसोल हार्मोनचे प्रमाण वाढते. उपाशी पोटी कॉफी प्यायल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरतं.
कॅफिन हे ऊर्जा देणार असतं. त्यामुळे जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा जीमला जात असाल तर त्याआधी कॉफी प्या. त्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्टअप होईल. पण एका कपापेक्षा अधिक चहा पिणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. तसंच रात्री उशीरा कॉफी (Coffee) पिणं टाळा. कारण असं केल्यास अनिद्रेचा त्रास उद्भवू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – वर्षा गायकवाड
- ओमायक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा – छगन भुजबळ
- महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उदय सामंत
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
- शर्यत पुन्हा सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण; बैलगाडा शर्यत प्रेमी आणि शेतकरी आनंदी