मुंबई – कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
देशात सोमवारी 27 हजार 553 कोरोना नवीन रुग्ण आढळले होते. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona ) 37 हजार 379 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासात 124 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 11 हजार 7 रुग्ण कोरोनमुक्त आहे. देशात सध्या 1 लाख 71 हजार 830 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच 3 कोटी 43 लाख 6 हजार 414 रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 82 हजार 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावला संख्या आहे. देशात आतापर्यंत 145 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुन्हा पाऊस! ‘या’ भागांमध्ये ६ जानेवारीपासून पावसाची शक्यता
- लॉकडाऊनबाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा – राजेश टोपेंची मोदींकडे मागणी
- मुंबईत कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपा
- ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा प्रयत्न – बच्चू कडू