येत्या १६ डिसेंबर पासून राज्यातील हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. त्यामुळे राज्यातील नवीन महाविकासआघाडीचे सरकार या अधिवेशनातून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. तर कर्जमाफीची घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. त्यामळे या अधिवेशनाकडे शेतकरी वर्ग हा खासकरून लक्ष देऊन बसला आहे.
यंदाचे अधिवेशन एकच आठवड्याचे घोषित करण्यात आले आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने अद्याप मंत्रिमंडळ तसेच खातेवाटपसुद्धा झालेले नाही. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधकांची संख्यासुद्धा मोठी आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन आरोप-प्रत्यारोपाने चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, दुसरीकडे राज्यावर सहा लाख कोटींचे कर्जसुद्धा आहे. यावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन कसे पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
चांगली बातमी ; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार “इतके” पैसे https://t.co/oq914aRZNN
— KrushiNama (@krushinama) December 4, 2019
सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय आहेत फायदे , घ्या जाणून … https://t.co/CoqBel9cje
— KrushiNama (@krushinama) December 3, 2019
महत्वाच्या बातम्या –
राज्य सरकार पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री
संत्री खाण्याचे हे आहेत फायदे नक्की वाचा
पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – एकनाथ शिंदे