कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही

शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित धनाची पेटी ठरलेला कांदा आता सामान्य ग्राहकांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे. आधी हॉटेलांतून, नंतर भज्यांमधून आणि आता भाजीमधूनही कांदा हद्दपार होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला काल वणी इथल्या उपबाजारात १२ हजार रूपयेप्रती क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. कळवण इथं कांद्याला ११ हजार रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजारसमिती आवारात मात्र उन्हाळी कांद्याची आवक घटली आहे. या ठिकाणी लाल कांद्याला ८ हजार १५२ रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.

अहमदनगर आणि सोलापूरच्या बाजारपेठेतही कांद्याला काल प्रती किलो शंभर ते सव्वाशे रुपये इतका भाव मिळाला. दरम्यान देशभरात कांद्याच्या वाढत्या किमतींचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल कांदा उत्पादक राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक झाली.

जुना कांदा संपला असून नव्या काद्यांचीही आवक बाजार समितीत निम्म्याने घटली आहे. भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी ओला कांदाही बाजारात आणत आहेत. काही शेतकरी पूर्ण वाढ होण्यापूर्वीच कांदा काढून आणत असून कांद्याची पातही आणली जात आहे. कांद्याच्या पातीची जुडी २० ते २५ रुपयांना विकली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50 हजार

सांगलीच्या महापुरात बचावकार्याची बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू

नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड – सुधीर मुनगंटीवार