पेस्टीसाईड ॲक्शन नेटवर्क इंडियाव्दारे ‘सीआयबी’कडे कीडनाशक कायद्यातील कोणत्या तरतुदीच्या आधारे एरियल फवारणीस मान्यता देण्यात येते, याबाबत विचारणा करण्यात आली होती. पेस्टीसाईड ॲक्शन नेटवर्क इंडियाचे हैदराबाद येथील संचालक नरसिंम्हा रेड्डी यांनी तसे लेखी पत्रच ‘सीआयबी’ला दिले होते.
देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी सेंट्रल इन्सकेटीसाईड बोर्डाची (‘सिआयबी’) परवानगी ही गरजेची आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत कोणालाही अशाप्रकारच्या फवारणीची परवानगीच देण्यात आली नसल्याचे ‘सीआयबी’ने कळविले आहे. त्यामुळे राज्यासह देशातही ड्रोन फवारणीचे प्रयोग हे अवैधरित्या झाले आहे असा आरोप पॅन इंडियाकडून करण्यात आला आहे.
त्यात ड्रोन फवारणीच्यावेळी हवेतून कीडनाशकाची मात्रा ही वातावरणात पसरत आणि त्याव्दारे पर्यावरणातील इतर सजीवांनाही नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यता आली आहे. केरळमध्ये एका गावात एन्डोसल्फानच्या एरिअल फवारणीमुळे झालेले दुष्परिणामही या संदर्भाने पॅन इंडियाने अभ्यासलाचा दावा करण्यात आला आहे. किडनाशकाचे अंश इतरत्र पसरतात त्यामुळेही अनेक धोके संभवत असल्याचे पॅन इंडियाने म्हटले आहे.
अन्न आणि पाण्यातही कीडनाशकाचे अंश यामुळे मिसळतात. त्यासोबतच हवाही प्रदूषित होण्याचा धोका आहे. पंपाव्दारे फवारणी करताना एकच व्यक्ती कीडनाशकाच्या संपर्कात येतो. ड्रोनने फवारणी मात्र अनेकांना अनेक प्रकारचे धोके संभवतात.
महत्वाच्या बातम्या -
पूर परिस्थितीमुळे वन रक्षक भरती प्रक्रिया पुढे ढकलली, सुधारित तारखा नव्याने कळविणार – वन विभाग
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील गोदावरी नदी काठावर राहाणाऱ्या नागरीकांचे प्रशासनाकडून स्थलांतर
‘स्वाधार योजने’चा आतापर्यंत ३५ हजार ३३६ विद्यार्थ्यांना लाभ – डॉ.सुरेश खाडे