कांदाच्या दरात चढउतार; शेतकरी झाले अस्वस्थ

नगर : राज्यामध्ये परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने शेतीमालाचे नुकसान झाले. त्यात दररोज अशा ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कांदा पिकावर झाला. अशा वातावरणामुळे शेतकऱ्‍यांना कांद्या पिकावर तीन-चार दिवसांत फवारणी करावी लागली आणि त्याचा खर्चही वाढला. हे सर्व करूनही कांदा पोसला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे कांदा उत्पादनात घट झाली. परिणामी कांद्यासह इतर शेतीमालाची मागणी वाढल्याने त्याचे भाव गगनाला भिडले.

मागील महिन्यात कांद्याला सर्वात जास्त वीस हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. कांद्याचा सरासरी दर हा दहा हजार ते बारा हजार रुपये क्विंटल होता. आता तोच दर थेट तीन ते चार हजार रुपये क्विंटलवर आला आहे. शिवाय दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. नैसर्गिक आपत्तीवर मात करून पीक घेतले असले, तरी पिकाच्या दरात चढउतार होत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. मागील काळात काही शेतकरी कांदा पिकामुळे लखपती झाले असले, तरी काही शेतकऱ्यांना मात्र उत्पादनात घट झाल्याने खर्चही निघेना झाला आहे.

नगर जिल्ह्यात कांदा पेरणी क्षेत्र कमी असून, लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. मात्र,यावेळी परतीच्या पावसाचे थैमान, त्यात ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. मागील महिन्यात कांद्याला राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत मोठा दर मिळाला. आता मात्र त्या दरात घसरण झाली आहे. दरात सतत चढउतार होत असल्याने शेतकरी मात्र अस्वस्थ आहेत.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार आहे – धनंजय मुंडे

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचे नुकसान

कृषी घटकांच्या विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण

पीक विमा योजना राबविण्यासाठी सरकारने केली आवश्यक उपाययोजना