देशात कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात 2 लाख 64 हजार 202 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 2 लाख 64 हजार 202  कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात  गेल्या २४ तासात  315 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात सध्या 12 लाख 72 हजार 73  सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 85 हजार 350  रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी  48 लाख 24 हजार 706  रुग्ण कोरोनमुक्त झाले आहे. देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.  देशात ओमायक्रॉनचे आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –