ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा – नरेंद्र मोदींचा इशारा

मुंबई : कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.

ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी(१३ जाने.) पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तद्पश्चात बोलत असतांना ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असा इशारा नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दिला आहे.

यावेळी बोलत असतांना मोदी म्हणाले आहे,’पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा ओमाक्रॉनचा प्रसार वेगाने होत असून आपले आरोग्य तज्ञ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्‍या वर्षात दाखल झाला आहे. कठोर परिश्रम हाच आमचा एकमेव मार्ग आहे आणि विजय हाच एकमेव पर्याय आहे. आम्ही १३० कोटी भारतीय आमच्या प्रयत्नांनी नक्कीच कोरोनावर विजय मिळवू.’ तसेच आपली तयारी कोविडच्या सर्व प्रकारांपेक्षा पुढे असली पाहिजे. आपण ओमायक्रॉनवर विजय मिळवल्यानंतर, आपल्याला व्हायरसच्या इतर प्रकारांशी लढण्यासाठी देखील तयारी करावी लागेल आणि यामध्ये राज्ये एकमेकांना सहकार्य करतील, असेही मोदी म्हणाले.

दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीस गृहमंत्री अमित शाह केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल , महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope)आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –