राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवसात आढळले तब्बल ‘इतके’ नवे कोरोना रुग्ण

पुणे – देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 2 लाख 68 हजार 833 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

 

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आता पुण्यात कोरोनाने कहर माजविला आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्या दहा हजारापार पोहोचली आहे. दिवसभरात १० हजार ७६ रुग्ण वाढले आहेत. तर २ जणांचा झाला मृत्यू झाला आहे.

दरम्यान सध्या जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या पुन्हा ५० हजारावर पोहोचली आहे. ही गेल्या तीन महिन्यांतील सर्वात उच्चांकी वाढ असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर पुन्हा होताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या –