सांगली – एका ऊसतोड मजुराने एक मोठा विक्रम केला. एका ऊसतोड मजुराने (Sugarcane laborer) एकट्याने एका दिवसात तब्बल २० गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम मोठा विक्रम केला आहे. या ऊसतोड मजुराचे नाव ईश्वर रामचंद्र सांगोलकर आहे. यांनी एकट्याने एका दिवसात तब्बल वीस गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम मोठा विक्रम केला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम सुरू आहे. ईश्वर रामचंद्र सांगोलकर एका दिवसात 16 टन ऊस तोडला आहे. या कामाबद्दल ईश्वर सांगोलकर यांचा सत्कार वारणा साखर कारखाना प्रशासनाने केला.
जत तालुक्यातील खैराव गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील ईश्वर सांगोलकर हा गेल्या पंचवीस वर्षांपासून वारणा साखर कारखाना आणि इतरही साखर कारखान्यात ऊसतोड मजूर (Sugarcane laborer) म्हणून काम करत आहे. ईश्वर यांनी वाळवा तालुक्यासह अनेक तालुक्यात ऊसतोडीचे कामे केली आहेत. मागील पंधरा दिवसांपासून कुंडलवाडी येथे ऊसतोड सुरु आहे. सागर सावंत यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना ईश्वर सांगोलकर यांनी एकट्याने दिवसाकाठी 16 टन ऊसतोड करून एक नवा विक्रम केला आहे.
त्यांनी केलेल्या या विक्रमाची वारणा कारखाना प्रशासनानेही दखल घेतली आहे. कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील, ऊस अधिकारी विजय कोळी शेती, गट अधिकारी अक्षय तोडकर, शेती मदतनीस प्रताप भोसले यांनी ईश्वर सांगोलकर यांचा थेट उसाच्या फडात जाऊन सत्कार केला.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ जिल्ह्याचा तापमानाचा पारा 7 अंशावर
- महाआवास अभियानाच्या लाभासाठी जिल्ह्यात मोहिम राबवा – जयंत पाटील
- सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे
- काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 2 लाख 68 हजार 833 कोरोनाबाधितांची नोंद
- जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२२-२३ यासाठी 308 कोटी 40 लाखाच्या रुपयाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता