लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते.

रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आले आहे. लाकूड रंगाने गडद लाल, कठीण असून ते चवीला तुरट असते. तसेच त्याला सहजासहजी वाळवी लागत नाही. लाकूड सहाणेवर उगाळून त्याचा लेप सांधेदुखी, सूज व त्वचादाह कमी करण्यासाठी लावतात. पानांचा रस कृमिनाशक व सूक्ष्मजीवरोधी आहे. जखमा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून सँटॅलीन नावाचे रंगीत राळेसारखे रसायन मिळते. त्या

रक्तचंदन या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तो तोडण्यावर बंदी घातली आहे.

लाल रक्तचंदनला एवढी मागणी का असते ?
लाल रक्तचंदनाला भारत तसेच चीन ,जपान म्यानमार आणि इस्ट एशिया या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते चंदनाचे अनेक औषधीगुणधर्म आहेत.
लाल रक्तचंदनाच्या लाकडाचा उपयोग हा डोके दुखी ,पित्त , त्वचा रोग ,फोड,ताप येणे,विंचू दंश इत्यादी आजरांवर उपयोग होतो असे इन्स्टिटयूड ऑफ वुड सायन्स अँड टेकनॉलॉजि यांचे म्हणणे आहे. तसेच संगीतामध्ये सुद्धा ह्या लाकडाचा उपयोग केला जातो म्हणजेच जे वाद्य वाजवले जातात त्या वाद्यांना ह्याच लाकडाचा उपयोग होतो. अनेक लोक घरात फर्निचर साठी हेचलाकूड वापरत्तात .काही खाद्यपदार्तनमध्ये वापरला जाणारा लाल रंग याच लाकडापासून वापरला जातो एका टनाचा भाव हा ५० ते ६० लाख रुपये आंतराष्ट्रीय बाजार भाव आहे .

हे झाड कुठ उगम होते…

भारतातील तामिळनाडू ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये छंदांची झाडे दिसून येतात सह्याद्री पर्वतरांग हि दक्षिणेपर्यंत पोहोचली आहे याच पर्वतरांगेत विस्तीर्ण जंगल सुद्धा आहेत मदुमलाई जंगल हे तीन राज्यात पसरले आहेत अश्या जंगलात ते दिसून येते हे झाड आकाराने छोटे असते त्याची उंची हि ५ ते ८ मीटर एवढी असते त्याचे साल हे राखाडी असते .

तास्किरी कुठे होते ?
कर्नाटकात रक्तचंदनाची झाड सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतात .आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यसीमेवर जी जंगले आहेत त्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते २०१५ साली आंध्रप्रदेशात २० लोकांचा इन्काउंटर केला होता.
ऑस्ट्रेलिया मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चंदन झाडाची लागवड केली जाते त्यामुळे त्याला आंतराष्टीय बाजारात मोठी मागणी आहे. परंतु अश्या दुर्मिळ झाडाची तोड चालू राहिल्यास या झाडाच्या प्रजाती नष्ट होतील

महत्वाच्या बातम्या –