वर्षानुवर्षे पिक घेतल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. मातीतील पोषणमुल्ये कमी झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनातही घट होते. हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे योग्य वेळी ओळखता येणे आणि त्यावर लगेच उपाय करणे सर्वात महत्वाचे असते.
हि लक्षणे कशी ओळखाल ,हे जाणून घ्या –
मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
अन्नद्रव्य लक्षणे
- नायट्रोजन(N) : जुनी पाने पिवळी पडतात. तसेच पूर्ण रोपावर पोपटी छटा पसरते.
- फॉस्फरस (P) : जुनी पाने लालसर जांभळी होतात. पानांची टोके जळाल्यासारखी दिसतात.
- पोटॅशियम (K) : जुनी पाने कोमेजतात, वाळल्यासारखी दिसतात. पानाच्या देठाजवळील शिरा पिवळसर होतात आणि पानाच्या कडा करपतात.
- सल्फर (S) : सुरुवातीला नवीन आणि हळूहळू जुनी पाने पिवळी पडू लागतात.
- मॅग्नेशियम (Mg) : जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात आणि केवळ पानाचा मध्यभाग हिरवा दिसू लागतो.
- कॅलशियम (Ca) : नवीन पानांचा आकार वेडावाकडा असतो.
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
अन्नद्रव्य लक्षणे
- बोरॉन (B) : फुटवे सुकून जातात.
- कॉपर (Cu): झाडांची वाढ खुंटते आणि पाने गडद हिरवी होतात.
- आयर्न (Fe): नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
- मँगनीज (Mn): नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात आणि झाडांची वाढ खुंटते.
- मॉलिबडेनम (Mo): जुनी पाने पिवळी पडतात. तसेच पूर्ण रोपावर पोपटी छटा पसरते.
- झिंक: फांदीच्या टोकाकडील नवीन पानांची वाढ खुंटते आणि पाने जवळ जवळ उगवतात. नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास काय करावे
- शक्य तितक्या लवकर कमतरता असलेले अन्नद्रव्य घटक असलेल्या खताची फवारणी करावी/ जमिनीतुन द्यावे.
- बाजारात अनेक उत्पादकांची चांगल्या दर्जाची खते सहज उपलब्ध आहेत.
महत्वाच्या बातम्या –
आता मुख्यमंत्री करणार कोल्हापूरच्या महापुराची पाहणी
दुष्काळामुळे सोलापूर जिल्हा बॅंकेच्या थकबाकीत पुन्हा वाढ
शेतकऱ्यांचे निवेदन ; हेक्टरी ३० हजार रुपये मदत देण्याची मागणी
भारताशी व्यावसायिक संबंधही तुटल्यामुळे पाकिस्तानमधील जनता अडचणीत
फेसबुक पोस्ट –
https://www.facebook.com/groups/268673980550963/?epa=SEARCH_BOX