काही जण टाइमपास म्हणून शेंगदाणे खाणे पसंत करतात. शेंगदाण्यांचा आपण वेगवेगळ्या पाककृतींमध्येही समावेश करतो. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, तेल आणि फायबरचे भरपूर प्रमाण आहे. नियमित योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून तुम्हाला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतील. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..
- आठवड्यातून ४-५ दिवस भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाशी निगडीत आजारांचा धोका कमी होतो.
- गदाणे भिजवून खाण्यामुळे यामध्ये असलेले न्यूट्रिएंटस आणि आयरन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवून हार्ट सोबत अनेक आजारात बचाव करते.
- शेंगदाण्यात ओमेगा ६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर आहेत.
- शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते.
- शेंगदाण्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल असते. त्यामुळे शेंगदाण्याच्या सेवनानं पोटाचे आजार नष्ट होतात. गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
महत्वाच्या बातम्या –