शिळा भात खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा भात खात असाल तर अति उत्तम. कारण शिळा भात हा आरोग्यास लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

  • तुम्हाला जर अल्सरचा त्रास असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळ्या भाताचे सेवन करावे. यामुळे तुमची अल्सरची समस्या दूर होण्यास मदत होईल.

  • भातामध्ये फायबर घटकही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे भात शिळा किंवा ताजा असला तरीही त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, पोटदुखीसारखे त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.
  •  माऊथ अल्सरचा त्रास असेल तर दोन्ही वेळेस जेवणात शिळा भात खावा. यामुळे माऊथ अल्सरचा त्रास आटोक्यात राहायला मदत होते.

  •  शिळ्या भातामुळे शरीराचं तापामान नियंत्रणात राहण्यास मदत होते. तांदूळ थंड प्रकृतीचा असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. नाश्त्यामध्ये शिळ्या भाताचे विविध पदार्थ बनवून त्याचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या –