नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते. खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
थंडीमध्ये खारीक खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. खारकेत भरपूर फायबर, जीवनसत्त्व बी १, बी २, बी ३,बी ५ असून पोटॅशियमही आहे. योग्य प्रकारे वजन वाढण्यासाठी खारकेचा वापर करावा, लहान मुलांना उगाळून द्यावी, मोठय़ाने भिजवून किंवा पावडर करून खावी.
तसेच सर्दी, पडसे, खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दूधात पाच खारीक, पाच काळामिरीचे दाणे, वेलचीचे तुकडे एकत्र करून उकळावेत. या मिश्रणामध्ये चमचाभर तूप मिसळा. हे ड्रिंक सायनसच्या रूग्णांदेखील फायदेशीर ठरते.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी
- वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उच्चस्तरीय बैठक
- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार
- सामाजिक न्याय विभागांतर्गत ५ योजनांसाठी सव्वा चौदाशे कोटी रुपये निधी वितरित – धनंजय मुंडे
- राज्यात आज रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू, माहित करून घ्या काय सूरू काय बंद!