दात पिवळे होण्याची समस्या अनेकांना असते. मात्र, सर्वात आधी आपण लक्षात घेतले पाहिजे की, दात पिवळे होण्यामागे कोणत्याही आजाराचं कारण नसतं. अस्वच्छपणा आणि चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे, हे यामागील कारणे आहेत. धुम्रपानामुळेही दात खराब होतात. तसेच चहा-कॉफिचं अतिसेवही याला कारणीभूत ठरु शकतं.
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी अनेकजण डेंटिस्टचे उंबरठे झिजवताना दिसतात. मात्र, असेही काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे दातांचा पिवळेपणा आपण दूर करु शकतो.
बेकिंग सोडा आणि लिंबू रसाची पेस्ट आपण रोजच्या जेवणावेळी अनेकदा वापरत असतो. आपल्या बहुतेक जणांच्या घरी या दोन्ही वस्तू उपलब्धही असतात. दात पांढरे शुभ्र करण्यासाठी सोडा आणि लिंबू अत्यंत परिणाम कारक आहेत.
बेकिंग सोडा खरखरीत असल्याने तो दातांवर स्क्रबर म्हणजेच घासण्याचं काम करतो, तर लिंबात सायट्रक असिड असतं, ज्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होते.
बेकिंग सोडा आणि लिंबाच्या पेस्टचं मिश्रण करुन ते दातांना लावा. त्यासाठी चमचाभर बेकिंग सोडा घेऊन, त्यात लिंबाचा रस एकत्र करा आणि त्याचा घट्ट पेस्ट तयार करा. त्यानंतर ट्युथब्रशने ही पेस्ट दातांना लावा. मिनिटभर पेस्ट दातांनाच राहू द्या, त्यानंतर चूळ भरा आणि तोंड स्वच्छ करा.
अर्थात, हा झाला घरगुती उपाय. मात्र, दातांमध्ये काही समस्या असेल, तर तुमच्या डेंटिस्टला जाऊन भेटून त्यांचा सल्ला घेणं अधिक योग्य. पण या उपायामुळे नक्की फरक पडेल, यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या –
- हाता-पायांना मुंग्या का येतात, माहित करून घ्या
- सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द; निवडणुकीनंतर नव्याने होणार आरक्षण सोडत – हसन मुश्रीफ
- संजय गांधी, श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास सूट – धनंजय मुंडे
- मोठी बातमी – शेतकरी आंदोलनाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले ‘हे’ मोठे आदेश