थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं गाजर (carrots) . बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. परंतु नुसतं गाजर (carrots) रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर (carrots) खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.
काय आहेत गाजराचे फायदे? जाणून घ्या
1. गाजरानं पचनशक्ती सुधारते. गाजरात बिटा कॅरेटिन असतं. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.
2. गाजर (carrots) कच्चं खावं. त्यानं जास्त फायदा होतो. गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता.
3. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असतं. त्यानं अॅनिमिया दूर होतो.
4. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते.
5. गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
6. गाजरांच्या पानांची भाजी तयार केली जाते. ती बनल्यावर उरलेलं पाणी पाऊन घ्या. त्यात पोषकद्रव्य असतात.
7. पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते.
8. गाजरात अ जीवनसत्व असतं. रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. तसंच डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
9. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.
10. थंडीत गाजराचं (carrots) सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.
महत्वाच्या बातम्या –
- आता घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ, जाणून घ्या
- मोठी बातमी – ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली महत्वाची बैठक
- आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार – राजेश टोपे
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १०० लाख क्विंटल साखर उत्पादन
- अभ्यासाला लागा! दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
- हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार – अजित पवार