Share

रोज खा दही-भात, ‘हे’ आहेत दही भात खाण्याचे फायदे!

दररोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

दररोजच्या जवेणात आपण भात नियमित खातो. परंतु, दही खाण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस तरी दह्याचे सेवन केले पाहिजे. भात खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. यामुळे दहा-भात खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. या आहारामुळे कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी

  • वजन कमी होते

दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते. कॅरलीज घटतात.

  • तापावर फायदेशीर

ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच                  दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते.

  • पोट बिघडल्यावर

पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते. अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.

जाणून घ्या पोळीला तूप लावून खाण्याचे फायदे

  • बद्धकोष्ठतेवर परिणामकारक

तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात. त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि             बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

  • तणावमुक्ती

दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतील हे घरघुती उपाय

नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील समस्या सोडविणार – मुख्यमंत्री

येवलेंचा चहा भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक खुलासा 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon