संशोधनानुसार आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक आहे. मासे खाल्यामुळे वजन नियंत्रत राहते शिवाय माश्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील अधिक असतात. माशांमधून शरीराला ओमेगा फॅटी अॅसिडचा पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबाची समस्या, रक्त साचून राहणे तसेच हृद्यविकाराची समस्या कमी होण्यास मदत होते.
जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे(
नैराश्य कमी होते – ओमेगा ३ फॅटी अॅसिड नैराश्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करते. ज्यांच्या आहारामध्ये ओमेगा ३ फॅट्स मुबलक असतात त्यांच्यामध्ये ३० टक्के नैराश्याची लक्षणं कमी दिसतात.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते – माशांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांच्या स्नायूंवर येणारा ताण कमी होण्यास मदत होतो. त्यामुळे वाढत्या वयानुसार दृष्टी कमजोर होण्याची शक्यता कमी होते.
डिमेंशिया / अल्झायमरचा त्रास कमी होतो – आठवड्यातून दोनदा माश्यांचा आहारात समावेश केल्यास डिमेंशिया किंवा अल्झायमर या आजाराचा धोका कमी होतो.
आवळा सरबत पिल्याने दूर होतात हे १० आजार https://t.co/Mah34m2lMU
— KrushiNama (@krushinama) January 10, 2020