परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांच अतोनात नुकसान झाल आहे. अशात जे काही थोडे फार पिकं वाचलेत त्यांना आता चांगले बाजारभाव मिळण्याचे चित्र दिसत असतानाच सरकारने शेतकऱ्यांच्या या थोड्याफार आनंदावर विरजण फेरलं आहे.
परतीच्या पावसामुळे नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील कांद्याचे भाव प्रती किलो 60 ते 65 रूपये किलो झाल्याने गुरूवारी 14 नोव्हेंबर रोजी मुंबई एपीएमसीत पुष्पा ट्रेडिंग कंपनीकडे इजिप्तचा 3 कंटेनर कांदा एक्स्पोर्टरने पाठवला. या कांद्याचे दर 15 ते 60 रूपये किलो आहेत. हलक्या प्रतीचा माल असल्याने हा कांदा दोन दिवस टिकू शकतो. येत्या रविवारी आणखी 110 ते 120 कंटेनर मुंबई एपीएमसीत दाखल होणार असून, 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत 80 कंटेनर कांदा मागवण्यात आला आहे.
इजिप्तच्या या कांद्याचे दर कमी असून तो फार काळ टिकणारा कांदा नसल्याने त्याची खरेदी सामान्य ग्राहक किंवा किरकोळ खरेदीदार करत नाहीत. केवळ हॉटेल व्यावसायिक तो माल खरेदी करत आहेत. इजिप्तवरून जेएनपीटी बंदरात येण्यासाठी कंटेनरला 15 दिवसांचा कालावधी लागला. काल गुरूवारी हे कंटेनर एपीएमसीत दाखल झाले. मालाला उठाव नसल्याने आजही निम्मा कांदा पडून आहे. कंटेनर मुंबईपर्यंत येताना 25 टक्के कांदा कंटेनर मध्ये सडला.
महाराष्ट्रातील कांदा आणि इजिप्त कांदा यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. राज्यातील उन्हाळी कांदा सहा महिने टिकतो. तो लवकर खराब होत नाही. मुंबईत किरकोळ खरेदीदारांची त्याला मागणी आहे. मात्र माल नसल्याने आहे त्या आवकेवर सध्या बाजार सुरू आहे. नगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 55 ते 60 रूपये दर आहे. रविवारपासून झजिप्तवरून आणखी 120 कंटेनर कांदा मागवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
युतीला जागावाटपावर समसमानच जागा मिळतील- संजय राऊत
प्रशासनाचे दुर्लक्ष ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात
आमदार महेश लांडगे यांच्या कडून पूरग्रस्तांसाठी पशुधनाची मदत
शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन