उद्धव ठाकरे आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

राज्यात कमालीचे राजकीय वातावरण तापले आहे. अस असल तरी दुसरीकडे ओल्या दुष्काळाने राज्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा गोंधळ सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शेकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे.

उद्धव ठाकरे आज सांगली-सातारा दौऱ्यावर आहेत. ओल्या दुष्काळाच्या नुकसानीचा घेणार आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हा दौरा करणार आहेत. यावेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी ते करणार आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कालपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी नाशिक जिल्ह्यात जावून त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात अभूतपूर्व गोंधळ निराम झाल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

युतीला जागावाटपावर समसमानच जागा मिळतील- संजय राऊत

प्रशासनाचे दुर्लक्ष ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात

आमदार महेश लांडगे यांच्या कडून पूरग्रस्तांसाठी पशुधनाची मदत