Share

VIDEO- साखर कारखान्याच्या जाचाला कंटाळून शेतकरी कुटुंब मरणाच्या दारात

Published On: 

🕒 1 min read

पुणे: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असणाऱ्या मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अन्यायामुळे गोरक्षनाथ साळुंखे या शेतकऱ्यावर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याची वेळी आली आहे. राजकारण्याच्या दोषापोटी या शेतकऱ्याला त्रास दिला जात असल्याचं चित्र समोर उभे राहत आहे. विरोधी पक्षात काम केले म्हणून त्यांच्या ऊसाला तोड दिलीच नाही. माजी आमदार शंकरराव गडाख यांचं संचालक मंडळ हे मुळा सहकार कारखान्यावर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला हवे.

काय आहे प्रकरण

नेवासा तालुक्यातील कांगोनी येथील शेतकरी गोरख साळुंखे यांनी विरोधी पक्षात काम केले म्हणून मुळा कारखान्याकडे नोंद असतानाही कारखाना प्रशासनाने त्यांच्या ऊसाला तोड दिलीच नाही. गोरख साळुंखे यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती हि अतिशय हालकीची असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच उसावर होणार होता. ऊसाल तोड येईल व पाच पैसे मिळतील अशी आशा होती. सदर घटनेप्रकरणी शेतकरी साळुंखे यांनी कारखाना प्रशासनाला ऊसाला तोड मिळण्यासाठी संपर्क साधला असता शेतात गाड्या जाणारच नाही, थोडं थांबा, तर कधी थेट ऊसाला तोड मिळणारच नाही अशी उडवाउडवीची उत्तरे कारखाना प्रशासनाने दिली.

माउलीला होतायत अश्रू अनावर.. सांगा मायबाप सरकार जगायचं कस?

दरम्यान, याविरोधात शेतकरी साळुंखे यांनी साखर आयुक्तालयात धाव घेतली आणि अडीच एकराचा ३ वर्षाचा मोबदला या शेतकऱ्याला अवघे २५ हजार रुपये मिळाला. त्यामुळे मागील ३ वर्षापासून अन्याय सहन करणाऱ्या या शेतकऱ्याला अखेर २३ मार्च पासून न्यायची हाक मारण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणास बसाव लागलं आहे.

बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon