शेतकऱ्यांना होणार फायदा, ट्रॅक्टरने चालणारे छोटे ऊस तोडणी मशीन कोल्हापूर मध्ये दाखल

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. भारतातील ६५% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. यावरून भारतातील शेतीचे महत्व लक्षात येते. शेती क्षेत्रात उत्पादित केलेल्या मालावर  प्रक्रिया करणारे विविध छोटे व मोठे उद्योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांना लागणार कच्चा माल हा शेतीतून पुरवला जातो. पण शेतातील पीक काढण्यासाठी यंत्राची गरज असते. सर्वच शेतकऱ्यांना हे यंत्र उपलब्ध होत नाहीत.

बांधावर खतांचा पुरवठा करण्यात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल – दादा भुसे

कोरोनाचा फटका हा संपूर्ण जगाला बसला आहे. तसाच त्याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोनाचा फटका जसा साखर उद्योगाला बसला तसाच ऊस उत्पादकाला सुद्धा बसला. दरवर्षी ऊस तोडणीचा प्रश्न ऊस उत्पादकांना व कारखानदारांना पडत असतो. दरवर्षी कामगारांची कमी होत असलेली संख्या आणि यंदा कोरोना मुळे सर्व ऊस तोडणी कामगार आपल्या गावी अडकून आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी ऊस तोडणी कशी करायची असा यक्ष प्रश्न ऊस उत्पादकांसमोर आहे.

जनहित शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा

फार्मटेक इंडिया कंपनी ने या सर्व अडचणी विचारात घेऊन अत्याधुनिक कमी किमतीचे ऊस तोडणी यंत्र तयार केले आहे. शेतामध्येच या यंत्राचे उदघाटन करण्यात आले. कोल्हापूर येथील केदार पाटील व कुमार दळवी यांच्या शेतात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच या यंत्रामुळे सरी मोडत नाही, १ तासामध्ये एक एकराची ऊस तोडणी १४ लिटर डीझेल मध्ये २-४ कामगार करू शकतात.

महत्वाच्या बातम्या –

महागडे औषध नाही, तर पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर का फायदेशीर असतो, घ्या जाणून……

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार – उद्धव ठाकरे