Hair Fall | केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो

Hair Fall | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळतीची समस्या खूप सामान्य झाली आहे. केस गळतीची समस्या सोडवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेली महागडी रसायनयुक्त उत्पादन वापरतात. मात्र, या उत्पादनामुळे केसांना हानी पोहोचवण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांचा वापर केला पाहिजे. हे उपाय केल्याने केसांना कुठल्याही प्रकारचे हानी पोहोचत नाही. केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही पुढील आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकतात.

आवळ्याचा मुरब्बा (Amla marmalade for Hair Fall)

आवळ्याचा मुरब्बा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्याच्या मुरब्ब्यात भरपूर प्रमाणात फायबर, आयरन, ओमेगा 3 आणि विटामिन सी आढळून येते. हे घटक इम्युनिटी पॉवर वाढवण्यासोबतच केस गळतीच्या समस्येवर मात करू शकतात. याचे नियमित सेवन केल्याने केसांच्या वाढीस चालना मिळते आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या (Green vegetables for Hair Fall)

केस गळतीची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, बीटा केरोटीन आणि विटामिन सी आढळून येते. जे केस गळतीची समस्या थांबवू शकते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने केस मजबूत होऊ शकतात.

गुळ (Jaggery for Hair Fall)

गुळाचे सेवन केल्याने केस गळती थांबू शकते. त्याचबरोबर गुळाचे नियमित सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढून पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गुळाचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. गुळ खाल्ल्याने केस मजबूत आणि निरोगी राहतात.

केसांना नियमित तेल लावा (Oil your hair regularly for Hair Fall)

केस निरोगी ठेवण्यासाठी केसांना तेल लावणे खूप महत्त्वाचे असते. केसांना तेल लावल्याने केसांची संबंधित अनेक समस्या सहज दूर होतात. त्यामुळे नियमित केसांना तेल लावल्याच गेले पाहिजे. नियमित केसांना तेल लावल्याने कोरड्या केसांची समस्या देखील दूर होऊ शकते.

आहारात विटामिन्स आणि मिनरल्स समावेश करा (Include vitamins and minerals in the diet for Hair Fall)

केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांना आतून पोषण देणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स समावेश करावा लागेल. यामध्ये तुम्ही कडधान्य, अक्रोड, पालक, टोमॅटो इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतात. या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणे केसांसाठी फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या