Rice Water | टीम कृषीनामा: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग स्वच्छ करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये अनेक पर्याय प्रभावी ठरतात तर काही पर्यायांचे दुष्परिणाम भोगावे लागतात. चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेण्यासाठीच असाच एक प्रभाव उपाय आहे तांदळाचे पाणी. तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तांदळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे तांदुळाचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.
तांदळाच्या पाण्याच्या मदतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला एक कप तांदळामध्ये तीन कप पाणी मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे पाणी तुम्हाला चांगले उकळून घ्यावे लागेल. हे पाणी थंड होऊ द्यावे लागेल. हे पाणी थंड झाल्यावर तुम्ही फेसवॉश म्हणून याचा वापर करू शकतात किंवा कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावू शकतात. तांदुळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने पुढील फायदे होऊ शकतात.
चेहऱ्यावरील ॲलर्जी दूर होते (Allergies go away – Rice Water Benefits)
चेहऱ्यावरील खाज, पुरळ किंवा इतर ॲलर्जीपासून मुक्त व्हायचे असेल तर तांदळाचे पाणी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तांदुळाचे पाणी हानिकारक बॅक्टेरियाला स्वच्छ करते. त्यामुळे तांदुळाच्या पाण्याचा वापर करून तुम्हाला चेहऱ्यावरील ॲलर्जीपासून सुटका मिळू शकते.
सनबर्नचा प्रभाव कमी होतो (Reduces the effect of sunburn – Rice Water Benefits)
तुमची त्वचा जर सूर्यप्रकाशामुळे जास्त जळत असेल तर तांदळाचे पाणी तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवून देऊ शकतो. नियमित तांदळाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेवरील सनबर्नची समस्या कमी होऊ शकते.
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होतात (Blackheads go away – Rice Water Benefits)
तुम्ही जर चेहऱ्यावरील ब्लॅकहेड दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल, तर तांदळाचे पाणी तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. नियमित रात्री झोपताना चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने ब्लॅकहेड्स सहज दूर होऊ शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या