Nervousness | घबराट आणि अस्वस्थ वाटतं असेल, तर करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Nervousness | टीम कृषीनामा: अनेक वेळा एखादी व्यक्ती घबराट आणि अस्वस्थतेमुळे खूप घाबरून जाते. तणाव, अनियमित जीवनशैली, चुकीचे खाणे इत्यादी गोष्टींमुळे या समस्या निर्माण व्हायला लागतात. अनेक लोक या समस्यांना तोंड देत असतात. या लोकांना सातत्याने डॉक्टरांकडे जावे लागते. या समस्येवर डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे औषध घेण्याचा सल्ला देतात. मात्र, सतत या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात. हे पदार्थ खाल्ल्याने अस्वस्थता आणि घबराट थोडी कमी होते आणि शरीर निरोगी राहते. घबराट आणि अस्वस्थ जाणवत असल्यास पुढील पदार्थांचे सेवन करावे.

डार्क चॉकलेट (Eat Dark Chocolate in Nervousness)

बहुतांश लोकांना चॉकलेट खायला आवडते. घबराट आणि अस्वस्थता जाणवत असल्यास तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकतात. डार्क चॉकलेट खाल्ल्याने चिडचिड, तणाव आणि अस्वस्थता दूर होण्यास मदत होते. डाग चॉकलेटमध्ये आढळणारे गुणधर्म अस्वस्थता सहज दूर करतात. त्यामुळे तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्ही कमी प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन करू शकतात.

हळद (Eat Turmeric in Nervousness)

हळद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट आणि अँटिइप्लिमेंटरी गुणधर्म अस्वस्थता आणि चिंता सहज दूर करतात. त्याचबरोबर हळदीचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. त्यामुळे हळदीचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

लिंबू (Eat Lemon in Nervousness)

लिंबू आपल्या शरीरातील अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. लिंबामध्ये आढळणारे गुणधर्म पोट निरोगी ठेवतात. त्याचबरोबर मूड खराब असल्यास तुम्ही लिंबाचे सेवन करू शकतात. तणाव आणि अस्वस्थता जाणवत असल्यास तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकतात. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने तुमचा मूड फ्रेश होऊ शकतो. त्याचबरोबर याच्या सेवनाने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

दही (Eat Curd in Nervousness)

बहुतांश लोकांना दही खायला आवडते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळून येतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. दह्याचे सेवन केल्याने अस्वस्थता आणि घबराट देखील दूर होते. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही दह्याचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Dry Skin Care | कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर

Rice Water | चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदुळाचे पाणी, होतात ‘या’ समस्या दूर

Neem Oil | केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Job Opportunity | इन्कम टॅक्स विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर