Dry Skin Care | कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर

Dry Skin Care | टीम कृषीनामा: त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण बदलत्या हवामानामुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रदूषणामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे त्वचेला कोरडेपणाच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक विविध प्रकारचे पर्याय शोधत असतात. तुम्ही पण जर या समस्यांवर मात करण्यासाठी पर्याय शोधत असाल तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपायांबद्दल माहिती सांगणार आहोत. पुढील गोष्टींचा वापर करून तुम्ही त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर करू शकतात.

मध (Honey For Dry Skin Care)

मध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर मधाचा फेस पॅक लावू शकतात. मधाच्या फेस पॅकच्या वापराने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी होते आणि त्वचा चमकदार होते.

ऑलिव्ह ऑईल (Olive oil For Dry Skin Care)

त्वचेला चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने चेहऱ्यावरील कोरडेपणाची समस्या देखील कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला आंघोळीच्या अर्धा तास आधी कोमट ऑलिव्ह ऑइल चेहऱ्यावर लावून मसाज करावी लागेल. ऑलिव्ह ऑइल अंघोळीच्या आधी चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी होऊ शकते.

बदाम तेल (Almond oil For Dry Skin Care)

बदाम तेलामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेचा रंग सुधारण्यासोबतच त्वचेवरील कोरडेपणाची समस्या देखील दूर करतात. यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेलाने मालिश करावी लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. नियमित त्वचेला बदाम तेल लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होऊ शकते.

वरील गोष्टी सोबतच त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात

कोरफडीचा रस (Aloe vera juice – Diet For Dry Skin)

कोरफडीचा रसाचे सेवन केल्याने त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊ शकतो. कोरफडीचा वापर क्रीम किंवा लोशन म्हणून देखील केला जातो. त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करू शकतात. तुम्ही दररोज एक ग्लास कोरफडीच्या रसाचे सेवन करू शकतात.

गाजर (Carrot – Diet For Dry Skin)

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गाजराचा समावेश करू शकतात. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आणि केरोटीन आढळून येते, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. गाजराचे नियमित सेवन केल्याने त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Rice Water | चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदुळाचे पाणी, होतात ‘या’ समस्या दूर

Neem Oil | केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Job Opportunity | इन्कम टॅक्स विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे