मुंबई – राज्यात कोरोना (Corona) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
विभागीय आयुक्त पुणे यांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरित करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाख, सोलापूर जिल्ह्याला १० कोटी, सातारा जिल्ह्याला १० कोटी ५२ लाख तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ८ कोटी ६१ लाख रूपये असा एकूण ३८ कोटी ५८ लाख रूपये निधी या जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीसाठी पुणे, सोलापूर, सातारा व गडचिरोली जिल्ह्यांनी केलेल्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरित करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान विभागाचा अंदाज: राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कमी होणार
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण
- तूर डाळीचे दर शंभरी गाठणार
- ‘चंदन शेती’ करोडोचे उत्पन्न देणारे पीक? सत्य कि अफवा !
- तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित नको – सुनिल केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २९ साखर कारखाने सुरु