वजन कमी करण्यास पनीर फायदेशीर

भारतीय जेवणात पनीरचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे.

पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अडीच फुटांनी कमी

प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन कमी करायलाही मदत होते.  पनीर मध्ये भूक कमी करणारे हार्मोन्स जीएलपी -१, पीवाइवाई आणि सीसीकेच्या स्तराला वाढवतात. तिथेच भूख वाढवणाऱ्या हार्मोनच्या स्तराला कमी करतात. त्यामुळे डायटिंगला फायदा होतो.

संत्री खाण्याचे हे आहेत फायदे नक्की वाचा

मात्र पनीर अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पनीरमध्ये गुड फॅट्स असतात. पनीरमध्ये कार्बोहाइड्रेट कमी प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी रोजच्या जेवणात लो-कार्ब असणे गरजेचे आहे. कॅल्शियम हाडांना आणि दातांना मजबूत बनवतात आणि फॅट्स कमी करतात.