राज्यात सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुप्रतिक्षीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज कोणत्याही अटीशिवाय माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कर्जमाफीसाठी राज्य सरकारला सुमारे 30 हजार कोटी रुपयांची गरज भासणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे. तर कर्जमाफीसाठी हवेत 30 हजार कोटी रुपये. शेतकरी संप आणि आंदोलने यापुढे झुकत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना अनेक निकष लावून कर्जमाफी घोषीत केली होती.
बळीराज्यामुळेच आपण जगतो त्याला अशी भिक नका देऊ – रुपाली चाकणकर
मात्र जाचक निकषांमुळे अनेक शेतकरी या कर्जमाफी योजनेत बसू शकले नव्हते. त्यातच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. फणडणवीस यांच्या सरकारकडून 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 891 कोटींची कर्जमाफी दिली होती. त्यावेळी कर्जमाफीसाठी जाहीर झालेल्या रकमेतील 6 हजार कोटी अद्याप शिल्लक आहेत.
बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा उद्रेक https://t.co/e4K8SuEFXV
— KrushiNama (@krushinama) December 24, 2019
मत्स्यपालन व शिंगाडा उत्पादन करुन शेतकऱ्यांचा प्रयोग ठरतोय प्रेरणादायी https://t.co/tmVtx4WDXC
— KrushiNama (@krushinama) December 24, 2019