रताळं खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे दोन प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी जास्त चांगले असते.. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणुन वापर अनेक ठिकाणी होतो.तसेच हे गरीबांचेही खाद्य आहे.हे पचनास हलके आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे…

  • रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे चार ग्राम फायबर असते.  म्हणूनच उपवासाच्या दिवसाव्यक्तिरिक्त ऐरवी रताळ्याचा आहारात समावेश करा.
  • रताळेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व अ असते. आपले डोळे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी हे महत्त्वाचे जीवनसत्व असल्याने आजारपण ही जास्त उद्भवत नाही.
  • रताळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवत नाही. याचाच फायदा वजन आटोक्यात आणण्यासाठी होतो. या गुणधर्मामुळे रताळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते.
  • रताळं नैसर्गिकरित्या गोड असल्याने हा लो-कॅलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. हेल्दीफाय मी च्या मते, एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून सुमारे 30 कॅलरीज मिळतात. तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करायची असल्यास रताळ्याचं कस्टर्ड हा एक उत्तम पर्याय आहे.यामुळे कमरेचा वाढता घेर आटोक्यात राहण्यास मदत होते
  • लघवी करण्याच्या वेळेस अडथळा उत्पन्न होत असेल तर रताळे खावे.

महत्वाच्या बातम्या –