उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो काही वेळेस ही उचकी थांबते तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो. उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक अकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते. म्हणून उचकी थांबण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करा.
लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.
सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय !
आपला श्वास रोखून ठेवा : एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याच प्रयत्न करेल तर उचकी आपोआप थांबेल.
साखर : उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते.
जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे
हळूहळू जेवा : अनेकवेळा फास्ट खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते.
घसा खवखवण्यावर त्वरित करा ‘हे’ उपाय ! https://t.co/NnT8bM19WD
— KrushiNama (@krushinama) January 7, 2020